जिमलगट्टा पोलीसांनी अवैध दारुसह एकुण 20,30,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 13/08/2024 रोजी एक इसम बोलेरो पिकअपने जिमलगट्टा ते देचलीपेठा रोडने अवेध दारुची वाहतुक करणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर, प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार व त्यांचे एक पथक सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे जिमलगट्टा पासून 02 किमी पुर्वेस जिमलगट्टा ते देचलीपेठा रोडलगत नाल्याजवळ जंगलात सापळा रचुन बसले असता, सकाळी 08:00 वा. चे दरम्यान मौजा जिमलगट्टा कडुन देचलीपेठाकडे एक संशयीत चारचाकी बोलेरो पिकअप वाहन हे भरधाव वेगाने येतांना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला थांबवून त्याचे नाव विचारले असता, त्याने आपले नाव आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा असे सांगितले.

त्यानंतर त्यास वाहन अडविण्याचे कारण सांगून सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 90 एम.एल रॉकेट देशी दारुचे 210 कागदी कार्टन बॉक्स मिळून आले असून, प्रति कार्टन बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकुण 21,000 नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल (विक्री किंमत प्रती नग 80/- रु. प्रमाणे) एकुण 16,80,000/- रुपयांचा दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, वाहन क्र. एम एच 26 बी.ई 4504 अंदाजे किंमत 3,50,000/- रुपये असा एकुण 20,30,000/- (अक्षरी वीस लाख तीस हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे जिमलगट्टा येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 81 महा. दा. का. अन्वये आरोपी नामे आदेश सत्यप्रकाश यादव, वय 36 वर्षे, धंदा – मजुरी, रा. जिमलगट्टा, तह. अहेरी जि. गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी  एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा  शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात प्रभारी अधिकारी जिमलगट्टा सपोनि. संगमेश्वर बिरादार, परिपोउपनि. आनंद गिरे,  केडमवार,  साखरे,  गणविर व  सुंकरी यांनी पार पाडली.

गडचिरोली पोलीस दलातील 17 पोलीस अधिकाऱ्याना पोलीस शौर्य पदक जाहिर

उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगतापपोलीस अधीक्षक नीलोत्पल