भेटी लागी जिवा लागलिसी आस.. अशी हि विठ्ठलाची निर्मल श्रद्धा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रत्नागीरी डेस्क 30 डिसेंबर:- मनामध्ये शुध्द भाव असेल तर देव पावतो अशी म्हण आहे. याचा प्रत्यय आठ महिन्यांपासून विठुरायाचे दर्शन बंद असल्याने मोठ्या तळमळीने बसवरील विठुरायाच्या चित्रावरच माथा टेकणाऱ्या सईबाई या भोळ्याबाबड्या महिला भाविकास आला. मागील अनेक दिवसांपासून सोशल माध्यमांवर गाजत असणाऱ्या छायाचित्रातील या महिलेस वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी विठ्ठलाच्या दर्शनाचा योग जुळवून आणला. या महिलेचे नाव सईबाई प्रकाश बंडगर असून त्या मोहळ तालुक्यातील रहिवाशी आहेत.

मागील काही दिवसांपासून एसटी बसवर असणाऱ्या विठ्ठलाच्या चित्रावर डोके ठेवून नमस्कार करणाऱ्या वृध्द महिलेचे छायाचित्र प्रचंड प्रसिध्द झाले. विठुमाउलीचे दर्शन बंद असल्याने अनेक भाविक हळहळ व्यक्त करीत आहेत. हीच तळमळ या चित्रामध्ये रत्नागिरी विभागाचे चालक कम वाहक भारत सरनाईक यांनी टिपली होती.

योगायोगाने त्या महिलेची भेट रामकृष्ण महाराज वीर याच्याशी झाली. त्यानें तिला ओळखलं आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलणं करून दर्शन घडवलं आणि त्यांचा सन्मान केला.