लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २७ एप्रिल : गडचिरोली पोलिस व मुक्तीपथने संयुक्त कारवाई करीत तालुक्यातील माडेमुल, हिरापुर व गडचिरोली शहरातील एकूण तीन दारूविक्रेत्यांकडून मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.
माडेमुल येथिल रीपिन सुरेश वाटगुरे याच्या घराची तपासणी केली असता २० लिटर मोहाची दारू आढळून आली. हिरापुर येथील गणेश कांबळे याच्या घराची तपासणी केली असता १० लिटर मोहाची दारू आढळून आली.
गडचिरोली शहरातील गुजरी लगत विठ्ठल मंदिर चा मागे अनुप कत्रोजवार हा नियमित खुले आम देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली असता, मुक्तीपथ व पोलीस विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करीत ६२ टिल्लू दारू जप्त केली. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, रायपूरे, नंदेश्वर यांनी केली.
यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, रेवणाथ मेश्राम उपस्थित होते.
हे देखील वाचा :
https://loksparsh.com/maharashtra/chain-hunger-strike-in-front-of-sironcha-tehsil-office-by-farmers-affected-by-meddigadda-project/37282/