त्याचा फैन ग्रुप कडून 5555 कोविड किट्स डोनेट करयाचा केली घोषणा .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख 2 नोव्हेंबरला आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखसाठी,त्यांच्या चाहत्यांसाठी हा दिवस खास असला तरी हा दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. त्याच्या सुपरस्टारचा वाढदिवस अधिक खास करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तो त्यांच्याच पद्धतीने साजरा केला.
दरवर्षी वाढदिवशी तो चाहत्यांना झलक देण्यासाठी त्याच्या गॅलरीमध्ये हजर असतो. मात्र यंदा मन्नतसमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.शाहरुख, यंदा कोरोनामुळे मन्नतबाहेर कोणीही गर्दी करु नका. माझ्या घरासमोरच नाही तर कुठेही गर्दी करु नका. इस बार का प्यार, थोडा दूरसे मेरे यार….’ असे आवाहन त्याने चाहत्यांना केलं.
शाहरुखच्या फॅनक्लबने या देणगीबद्दल ट्विट केले आहे. ट्विटनुसार शाहरुखच्या चाहत्यांनी गरजूंसाठी कोविड किट तयार केली आहेत. यात 5555 मास्क , सेनिटायझर्स आणि भोजन समाविष्ट आहे. फॅनक्लबने आपला फोटोही शेअर केला आहे. यावर्षी कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी कव्हर केलेल्या किट ही लोकांची सर्वात मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांचे हे काम कौतुकास्पद आहे.