लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभागाच्या वतीने १६ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत ऑनलाईन व्याख्यानमाला “Know-Age 5.0” या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना इंग्रजी साहित्य नव संशोधन व रचना, साहित्यिक जाण, नव तंत्रज्ञान व साहित्य आणि वैचारिक संवादासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे होते. व्याख्यानमालेमध्ये विविध विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील डॉ.अरविंद बरडे यांनी इंग्रजी संभाषण कौशल्य: नोकरी संधी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वाणिज्य विभागाच्या डॉ.देवदत्त तारे यांनी एकविसाव्या शतकासाठी आवश्यक कौशल्ये, एफ.ई.एस. महाविद्यालय चंद्रपूर येथील डॉ.आम्रपाली देवगडे यांनी करिअरचा प्रवास व सामर्थ्य, आर.डी.भोयर महाविद्यालय, वर्धा येथील डॉ.वैभव पिंपळे यांनी इंग्रजी साहित्यातील आजचे भारतीय लेखक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, लोहारा येथील प्रा. मनोज हेमने यांनी इकोफेमिनिझम: पितृसत्ताक समाज व भांडवलशाही, पोद्दार इंटरनेशनल स्कुल, अमरावती येथील प्रा.जितेंद्र बुटे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुलभूत ओळख: उदयोन्मुख ट्रेंड आणि संधी व बळिराम पाटील महाविद्यालय नांदेड येथील डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर यांनी आफ्रिकन साहित्य व सांस्कृतिक ओळख , लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथील डॉ.राजपालसिंग चिखलीकर यांनी सबऑल्टर्न दृष्टिकोन भारतीय साहित्यिक संदर्भात व नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथील डॉ.संदीप काळे यांनी रचनात्मक आणि शब्दार्थद्विविधा या विषयावर इंग्रजी प्राध्यापक व अभ्यासक यांनी मार्गदर्शन केले.
इंग्रजी विभाग द्वारे हि व्याख्यानमालेची सुरुवात २०२१ ला झाली असून प्रत्येक वर्षी राबविण्यात येत असुन यंदाचे हे पाचवे वर्ष होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी साहित्यातील नव्या प्रवाहांची ओळखच होत नाही, तर त्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक बाबीसंदर्भात व्याख्याने आयोजित करण्यात आली असुन यामध्ये आतापर्यंत इंग्रजी विषयातील प्राध्यापक व अभ्यासक यांची ६० व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत व युटूब च्या माध्यमातून उपलब्ध करून गोंडवाना विद्यापीठ येथील संशोधक व विद्यार्थी यांचा लाभ घेत आहेत.
प्रा.अतुल गावस्कर व डॉ.वैभव मसराम यांनी व्याख्यानमालेचे समन्वयक व डॉ.शिल्पा आठवले व डॉ.प्रमोद जावरे, विभाग प्रमुख इंग्रजी विभाग यांनी व्याख्यानमाला सह-समन्वयक म्हणुन मोलाची भुमिका पार पाडली. कु.अलिशा गजभिये, कु.रितु भामरे एम.ए इंग्रजी विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी व्याख्यानमाला संचालन व आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.