विकास कामांसाठी निधी उपलब्ध द्या – कोपेला ग्रामस्थांची मागणी

  • कोपेला व अमडेल्ली वासीयांची जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा, दि. २२ एप्रिल: मागील आठवड्यात गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिरोंचा तालुक्यातील विकासकामांचे भूमीपूजनासाठी सिरोंचा तालुक्यात दौरा केला. या दौऱ्यात कोपेला व अमडेल्ली चे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी जि. प. अध्यक्षांचे भेट घेऊन निवेदन देऊन विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

         कोपेला ग्राम पंचायत कडून जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनात झिंगाणूर ते अमडेल्ली व अमडेल्ली ते सिरोंचा पर्यंत पक्के रस्त्यांची बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, समाजमंदिर बांधकाम, हातपंप, सोलारवर चालणाऱ्या ट्यूबवेल साठी निधी, स्मशानघाट कडे जाणाऱ्या नाल्यावर पुलवजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन कोपेला ग्राम पंचायत मधील ग्रामस्थांचे समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी जि. प. अध्यक्षांनी कोपेला ग्राम पंचायत ला विकासकामांसाठी आवश्यक निधी सह समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना दिले.     

यावेळी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देतांना जि. प. सदस्या जयसुधा जनगाम, आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविसं सल्लागार रवी सल्लम, बामणीचे सरपंच अजय आत्राम, झिंगाणूरचे सरपंच निलिमा कारे मडावी, गरकापेठा चे सरपंच सुरज गावडे, उपसरपंच वेंकटी दासरी, दुर्गेश लंबाडी, कोपेलाचे सरपंच सुरेश जनगाम, उपसरपंच सुरेश मडे, सडवली जनगम, समय्या कोंडागोरला, सुरेश गावडे, समय्या मडे, सुंगा गावडे,सोमय्या आत्राम, सुंगा आत्राम, शंकर कुरसम, समय्या लच्चा मडावी आदी उपस्थित होते.

zp ajay kankadalwar