लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नागपूर – मंत्रिमंडळ बैठकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दर महिना देण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पुर्ती पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मंत्र्यांची पालकमंत्री आणि बंगले, अधिकारी यांच्यासाठी भांडणे सुरु असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमध्ये सर्व मंत्री हे फक्त सत्तेसाठी एकत्र आले असल्याची टीका केली. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. मात्र निर्णय घेण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत. मंत्र्यांचे बंगले, घर आणि अधिकाऱ्यांसाठी भांडण सुरु असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, अशी टीका त्यांनी केली.
आज महायुती सरकारची पहिली कॅबिनेट आहे. यामध्ये त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांमध्ये वाढ करुन 2100 रुपये करण्याचा निर्णय घ्यावा. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होतो का, हे देखील पाहावे लागेल. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. धान खरेदीची तारीख 31 डिसेंबरपर्यंत होती. त्याची मुदत वाढवली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केली.