लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडने गडचिरोली जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : – लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी कंपनी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी २० कि.मी. परिसरातील गावांमधील १५०० व्यक्तींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणात खालील मूलभूत कौशल्यांचा समावेश असेल: वेल्डिंग, बार बेंडिंग, स्क्रॅप फोल्डिंग, गावांडी काम.
प्रशिक्षण तपशील: प्रशिक्षण कालावधी हा ३ महिन्यांचा राहील, या कालावधीत मिळणारे मानधन प्रति महिना ₹५,५००/- राहील. प्रशिक्षण सत्रे खालील सहा कार्यक्षेत्रांवर (एओपी) ०१-१०-२०२४ पासून आयोजित केली जातील आणि निवड प्रक्रिया खालील तारखांपासून सुरु होईल:
आलदंडी (१०-०९-२०२४)
हलेवारा (११-०९-२०२४)
पिपलिबुर्गी (१२-०९-२०२४)
गट्टा (१३-०९-२०२४)
गार्डेवाडा (१४-०९-२०२४)
वांगेटुरी (१५-०९-२०२४)

सफल प्रशिक्षणार्थींना क्षेत्रात विविध कामाच्या स्थळी नोकरीची संधीही मिळेल.लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड गावसमूहांच्या विकास आणि भल्यासाठी खूप कटिबद्ध आहे.आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आम्ही मूल्यवान कौशल्ये आणि संधी प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत, जे दीर्घकालीन वाढ आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देईल.स्थानिक प्रतिभेत गुंतवणूक करून, आम्ही क्षेत्राच्या शाश्वत विकासात सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करतो.

Comments (0)
Add Comment