23 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत अकोल्यात लॉकडाऊन: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि. २२ फेब्रुवारी:अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता जिल्हाधिकारी पापळकर यांनी नुकतेच आदेश पारित करीत जिल्ह्यातील अकोला शहर, मुर्तीजापुर शहर, अकोट शहर या तिन्ही ठिकाणी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला असून सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याचे आदेश दिले असून त्या व्यतिरिक्त इतर कुठलीही प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले नसून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता अमरावती पाठोपाठ आता अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आदेश काढले असून त्या आदेशात अकोला, मुर्तीजापुर आणि अकोट या परिसरात कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहे आहेत. त्यानुसार लॉकडाऊन असलेल्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने उघडण्यास केवळ अनुमती देण्यात आली आहे, तर ठोक भाजी विक्रेता यांना सकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत परवानगी दिली असून लग्न समारंभात 25 जणांनाच परवानगी असल्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.

Jitendra Papalkar