प्रियदर्शिनी महिला मंडळातर्फे लोकमान्य टिळक जयंती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर दि, २४ जुलै :  प्रियदर्शिनी महिला मंडळ चंद्रपूर संचालित ज्ञानोदय तुकूम चंद्रपूरच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा शनिवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला.
सुरवात भारती उपाध्ये, प्रियंका पत्तीवार, अभ्यंग गंधेवार यांच्या स्वागत गीतानें झाली. प्रमुख पाहूणे म्हणून उपाध्यक्ष वर्षा सुरंगळीकर आणि चंदा गाडगे उपस्थित होत्या. पाहूण्यांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. सरस्वती पुजनानंतर प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रज्ञा गंधेवार यांनी केले. कार्यक्रमामध्ये सर्व बालगोपालांनी भाग घेतला. त्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाटक सादरीकरण केले. यावेळी लोकमान्य टिळकांच्या भुमिकेत हिमांशु बावणे, शिक्षकाच्या भुमिकेत माही राहूलगडे, त्यासोबत गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली.

गुरुपोर्णिमेतील भूमिका- मनस्वीरी खनके ऋषी, फादर ऑफ सर्च प्रियांषू दडमवार, आई प्राजक्ता कामतवार, मौलवी मुजम्मिल अन्सारी यांनी भूमिका वठविली. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर प्रत्येक मुलाने दहा ओळी सादर केल्या. प्री. प्रायमरी मुलांनी वेशभूषा माध्यमातून लोकमान्य टिळक सादरीकरण केले. संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षकांनी अथक परिश्रम केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन वैशाली पांडे, नियोजन शुभांगी जांभुळकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रणिता कोसे यांनी मानले. तसेच भारती मुक्कावार, नलिनी ताजणे यांनी सुध्दा अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रोत्साहनपूर्वक बक्षीस वितरण करण्यात आले.

हे देखील वाचा ,

आर्थिक विवंचना व्यापाऱ्यांना ठरते का जीवघेणी?

आंतरराष्ट्रीय जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ‘मान्सून आर्ट शो’ गडचिरोलीची रुषाली उईके हिच्या कलाकृतीची प्रदर्शनात निवड

गडचिरोली ला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षणातून वगळल्याने ओबीसीत तीव्र नाराजी..

priydarshani mahila mandal chandrapur