ज्येष्ठ आदिवासी नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचा अनोखा उपक्रम..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २६ जानेवारी : गडचिरोलीत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ वा वर्धापन दिन मोठ्या हर्ष उल्हसात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने स्थानीक ज्येष्ठ नागरिकाला ध्वजारोहणाचा मान देऊन अनोखा सन्मान केला आहे. येथील माईन्स कॉम येथील मैदानावर हेडरी येथिल ९० वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्री. पांडू कोत्तूं तेलामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लॉयडस मेटल अँड एनर्जी कंपनी मार्फत वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासह, विविध क्रीडा कौशल्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक श्री. पांडू कोत्तूं तेलामी यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर लॉयडस मेटल कंपनीच्या संचालकांनी श्री. पांडू कोत्तूं तेलामी(९०) यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानीत केल्याने आदिवासीं बहुल नक्षलग्रस्त असलेल्या परिसरात एक नवीन आदर्श निर्माण केल्याने लॉयडस मेटल अँड एनर्जी कंपनीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

क्रिडा कौशल्यात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विजेता संघाला अतिथी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले.
यावेळी लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, स्थानिक, हेडरी गावच्या परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

 

lyods metal companysurjagad