जागतिक परिचारिका दिनानिमित्त माँ विश्वभारती सेवा संस्थेतर्फे परिचारिकांना फळवाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १२ मे : जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज माँ विश्वभारती संस्थेतर्फे अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय, आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली आणि सेवासद्न रुग्णालय नागेपल्ली येथे परिचारिकांना तसेच रूग्णांना फळवाटप करण्यात आले.

फ्लोरेन्स नाईटगेल या परिचारिकेने १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना “लेडी विथ द लॅम्प” (The Lady with the Lamp) असे म्हणत. त्यामुळे त्यांचा १२ मे जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

माँ विश्वभारती सेवा संस्थेतर्फे आजच्या कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन परिचारिका अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांचा कार्याचा सन्मान करून आज संस्थेतर्फे परिचारिकांना आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले.

यावेळी माँ विश्वभारती सेवा संस्थेचे अध्यक्ष चांद्रकिशोर पांडे, अमोल कोलपाकवार, गंगाधर रंगू, मिलिंद खोंड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश लाडस्कर, डॉ. संजय उमाटे, डॉ अलका उईके, डॉ. अनुपमा विश्वास, मुख्य परिचारिका रोशनी दुर्गे आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा  :

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक

घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने