लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धानोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धानोरा येथे ६ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रम श्रद्धा व शिस्तबद्धतेने पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रुशीजी मशाखेत्री होते. नगरसेविका अलका मशाखेत्री, रजनी मशाखेत्री, तसेच मार्गदर्शक म्हणून राजकुमार वाघमारे व निकोषे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर मशाखेत्री यांनी केले.
या वेळी अॅड. सुदत्त वाघमारे यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर आधारित विचारप्रवर्तक भाषण केले. सामाजिक समत्व, मानवाधिकार व ज्ञानास्त्राच्या महत्त्वाबाबत केलेले त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना आत्मपरीक्षणाचा संदेश देणारे ठरले.
कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध समाज, धानोरा यांच्या वतीने अध्यक्ष रुशिदेव मशाखेत्री, उपाध्यक्ष पुरुषोत्तम धावले आणि सचिव धर्मेंद्र मशाखेत्री यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यापासून ते यशस्वी नियोजनापर्यंत तिघांचे मोलाचे योगदान राहिले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त हेल्पिंग हँड बहुउद्देशीय संस्था आणि बौद्ध समाज, धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांना दिवाळ घड्या आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव आशिष मशाखेत्री, शुभम कोसामशिले आणि विनेश गावडे उपस्थित होते.
कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल Helping Hand संस्थेच्या अध्यक्षा सौ. पायल मशाखेत्री यांनी सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांचे आभार मानले.