माणसाला माणसासारखे वागवा हा महत्वाचा मंत्र महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला देण्याचे काम केले – आरोग्यमंत्री राजेश टोपे.

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ६ डिसेंबर: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाना दिनानिमित्य जालना शहरातील मस्तगड येथे असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलतांना ना. राजेश टोपे म्हणाले आज आपण जी माणसामधील माणुसकी बघत आहोत त्या माणुसकीची देण कुणी दिली असेल तर ती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे, माणसाला माणसासारखे वागवा हा महत्वाचा मंत्र त्यांनी आपल्याला देण्याचे काम केले. घटनेतील सर्व सार जो की बंधुत्वाचा, समतेचा, न्यायचा विषय असेल हे सर्व विचार घटनेमध्ये टाकून खऱ्या अर्थाने आज अतिश्रेष्ठ अशी घटना आपल्या देशाला दिली आहे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आपण सर्वांनी आयुष्यभर जगावे, खऱ्या अर्थाने हीच आपल्या मनाशी खुणगाठ बांधा असे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय त्यांनी आज जालना शहरातील मस्तगड येथे असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून  अभिवादन केल्यानंतर बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचीही उपस्थिती होती.