प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात; केसरकरांचा आरोप.

शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या सर्व फुटींमागे शरद पवार यांचाच हात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

13 जुलै :- शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप  शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात  आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी ‘एबीपी माझा’सोबत बोलताना त्यांनी आरोप केला आहे.

शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले  शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर वेले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

हे देखील वाचा :- अतिवृष्टीनंतर गावात शिरलेल्या पावसाच्या पाण्यातून 87 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले https://loksparsh.com/top-news/after-the-overcrowding-87-escaped-safely-in-aheri-tahashil/27510/

shard pawar vs kesarkarshivshenashivshenavsshinde