महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि विद्युत्त क्षेत्रातील कर्मचारी यांनी प्रीपेड स्मार्ट मीटरचे विरोधात केले आंदोलन !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ठाणे :  मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ३ जुलै २०२४ रोजी सर्वसामान्य ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत आसे सांगितले होते. परंतु मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेचा शुभारंभ केला. त्याविरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत्त क्षेत्रातील इतर कामगार संघटनेने वागळे इस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेचा जाहीर निषेध केला आहे.

सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ३ जुलै २०२४ रोजी ग्वाही दिली होती की,  सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत.  तरीही ठाण्यात आणि महाराष्ट्रात इतरत्र खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत. ही मनमानी आम्हाला मान्य नसून  प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. तसेच प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे सामान्य वीज उपभोक्त्यांना  खूपच नुकसान सोसावे लागेल.

गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांचा कडाडून विरोध होत आहे. आम्ही देखील कामगारविरोधी आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला जाहीर विरोध करत आंदोलन केले.

हे ही वाचा,

गडचिरोली वनविभागाच्या नियोजनशून्यतेमुळे उद्यानाची लागली “वाट”

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत तुषार दुधबावरे यांचे सुयश

सहाय्यक आरटीओ यास चारशे रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक

महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री स्व मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त 10 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात

 

प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यतामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेचा शुभारंभ केला