जि. प. अध्यक्षाच्या हस्ते पेरमिली-भामरागड मेन रोड ते चंद्रा टोला पर्यंत खड़ीकरण रस्ता बांधकामचे भूमिपूजन 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी :  तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय पेरमिली अंतर्गत येत असलेल्या चंद्रा टोला या गावी जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना अडचण निर्माण होत होती. जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जानेवारी महीन्यात पेरमिली गावाला भेट दिली असता तेव्हा चंद्राटोला येथील नागरिकांनी रस्त्यांची मागणी केली होती.

मागणी नुसार जिल्हा परिषदेतून ३०-५४ निधी अंतर्गत रस्ते खड़ीकरण योजनेतून ६० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याने पेरमिली-भामरागड मुख्य रस्तावरून मेन रोड ते चंद्रा टोला पर्यंत खड़ीकरण रस्ता मंजूर झाले असून सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

पावसाळयात सदर रस्त्यात चिखल होऊन नागरिकांच्या आरोग्यवर परिणम होत असतो व चिखलातून ये-जा करण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे रस्ता बांधकाम आवश्यक असल्याने सदर रस्ता मंजूर करण्यात आला असून नागरिकांना सोईचे होईल.

सदर रस्ता भूमिपूजनाच्या वेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पेरमिली ग्राम पंचायतचे सरपंचा किरणताई कोरेत, उपसरपंच सुनील सोयाम, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य प्रमोद आत्राम, आदिवासी विध्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते अशिफ खाँ पठाण, श्रीकांत बंडामवार, कवीश्वर चंदनखेळे, प्रशांत गोडसेलवार, गजानन सोयाम व आदी नागरिक उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

मयूर फरताडेने शोधून काढला फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग

ajay kankadalwarlead story