मिळालेल्या ज्ञानातून जिवणाच सोनं करा – डॉ.एम.यू.टिपले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क .

आलापल्ली, दि. २५ मार्च: राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे सत्र २०१९-२०२० पदवि परिक्षा पास झालेल्या बि.ए.बि.काॅम.आणि एम.ए. (अर्थ) च्या विध्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ महाविद्यालयात डॉ.मारोती ऊध्दवराव टिपले प्राचार्य (प्र.) यांचे अध्यक्षतेखाली आनंदी दिनाचे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे निर्देशानुसार घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एम.यू.टिपले प्राचार्य यांचे कडून पदवी स्विकारताना कू.जयश्री खांडरे बि.काम.ची विद्यार्थ्यांनी

या समारंभात अतिथी म्हणून प्रा.पी.एन. घोडमारे, डॉ.एन.टि. ख्रोब्रागडे, आणि डॉ. आर. एन.कूबडे मंचावर विराजमान होते. सत्र २०१९-२०२० मध्ये पदवीची परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभातून पदवीदान करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.एम.यू.टिपले म्हणाले की, आता आपणास पदवी मिळाली आहे. आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या जोरावर नोकरी किंवा धंदा करून आपल्या जिवनाच सोनं करून आपल्या कूटूंबाचे उत्पन्नात भर टाकावी. असे स्पष्ट केले. सदर पदवीदान समारंभातील पदवी प्राप्त बि.काॅम.च्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कडून महाविद्यालय आलापल्लीला पुस्तके दान दिलीत. हे दानातील पूस्तके महाविद्यालयाचे वतीने ग्रंथालय प्रमूखानी स्विकारले. या प्रथमच झालेल्या पदवीदान समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. कू. प्रतीमा सूर्यवंशी तर आभारप्रदर्शन डॉ.आर.डब्लू.सूर यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी समस्त प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि देवाडकर, तलांडे यांनी तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Tiple