मल्लिकार्जुन खरगे काॅंग्रेसचे नवे अध्यक्ष

तब्बल 24 वर्षांनी काॅंग्रेसमध्ये घडला इतिहास, गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर :- भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यात मल्लिकार्जुन खरगे यांनी बाजी मारली असून आत ते काॅंग्रेसचे नवे अध्यक्ष असतील. तब्बल 24 वर्षांनी काॅंग्रेसच्या इतिहासात गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष झाले आहेत. काॅंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत मल्लिकार्जुन खरगे यांनी बाजी मारली.

देशभरातील 40 केंद्रांवर उभारलेल्या बुथवर मतदान करून मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यातील 9800 हुन अधिक काॅंग्रेस नेत्यांनी आपली निवड केली आहे. नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खरगे हे सुरूवातीपासूनच पुढे होते. याचे मोठे कारण म्हणजे खरगे यांना गांधी घराण्यातील दिग्गज काॅंग्रेस नेत्यांचा पाठिंबा होता.

हे पण वाचा :-

सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड सुरूच !

‘आप’ च्या कार्यालयावर हल्ला … वांद्रे पूर्व येथील घटना !

congresskhargenewspresident