शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बुलडाणा  ४ ऑगस्ट : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांनी कामिका एकादशी दिनी आज  सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

गत ४ दिवसांपासून मल्टीऑर्गन फेलीवरमुळे बुलडाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त  शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ होती, त्यांच्या सांगण्यानुसारच ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका..’ म्हणूनच त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह ट्रीटमेंट  सुरू होते . त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे ऑक्सीजनही लावण्यात आला आज सायंकाळी शिवशंकरभाऊ पाटील त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोना नियमामुळे सायंकाळी साडेसहा वाजताच घराजवळच्या शेतातच अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहेत. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी  येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या   वतीने सांगण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान व धार्मिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा ,

‘ड ‘ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करा-खा. अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

 

युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या समाधी समोर कचऱ्याचे होम हवन, पूजन करून केले आंदोलन

तलासरिमध्ये ‘माझा दाखला माझी ओळख’, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याचा पथदर्शी उपक्रम

 

leadstoryshivshankarpatilshrisantgajananmaharajsansthannshegav