लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सिंधुदुर्ग मुंबई 1 डिसेंबर :- कोकणात पडणाऱ्या अवकाळी पाऊस, दाट धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळे आंब्याचा मोहोर कुजण्याची व काळा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे आंबा पिकावर तुडतुडया सारखे किडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. सध्या कुठे झाडाला फुलोरा येण्याची व आंबे येण्याची प्रकिया सुरू होती अश्याच वेळी बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला होताना दिसतोय. त्यामुळे यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने लांबणीवर पडणार आहे. तर फवारणी साठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत देखील दुप्पट वाढ झाल्याने होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही.
सतत बदलत असलेल्या वातावरणामुळं फळांचा राजा हापूस आंब्याला फटका बसला आहे. कोकणात पडणाऱ्या अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात झाली आहे. तुडतुडया सारख्या किडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने होणार आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळं फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
हे पण वाचा :-