मनीष रक्षमवार यांनी आपल्या जन्मदिनी मुल उपजिल्हा रुग्णालयाला दिले सात ऑक्सिजन सिलेंडर भेट

  • कोरोना प्रदुर्भावाच्या कठीण काळात जन्मदिनी दिला ऑक्सिजन सिलेंडर भेट.
  • आ. सुधीर मुनगटीवार आणि तालुका प्रशासनाने मनीष रक्षमवार यांनी मानवतेचा मोठा संदेश दिल्याने अभिनंदनाचा केला वर्षाव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २५ एप्रिल: सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते मनीष रक्षमवार यांनी आपल्या जन्मदिनाच्या दिवशी कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अगदी साधेपणात जन्मदिवस साजरा करून आज महाराष्ट्रात ऑक्सिजन साठी असलेली अडचण बघून त्यांनी जन्मदिनाचा खर्च वाचवून  कोवीड-१९ च्या प्रादुर्भावाने संक्रमित झालेल्यांना ऑक्सिजन सिलेंडरची आवशक्यता असल्याने उपजिल्हा रुग्णालय मुल येथे सात ऑक्सिजन सिलेंडर भेट देऊन मानवतेचा संदेश दिला आहे.

युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या जन्मदिनाच्या पूर्व संध्येला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात सात ऑक्सिजन सिलेंडर भेट दिल्याचे आरोग्य प्रशासनाने सदर माहिती तालुका दंडाधिकारी तसेच माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिली. जन्मदिनाच्या निमित्याने मनीष रक्षमवार यांनी अगदी साधेपणात जन्मदिवस साजरा करून उर्वरित पैशाचा कोव्हीड-१९ च्या कठीण समयी प्राणवायू आरोग्य विभागास प्रदान केल्याने आ. मुनगंटीवार यांनी त्यांचा अभिनव उपक्रमाचे कौतुक करून प्रशस्ती पत्र देऊन आभार मानले.