आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ मराठा महासंघ उतरले मैदानात

आमदारांचे ॲट्रॉसिटी वक्तव्याचे प्रकरण..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा :  येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या ॲट्रॉसिटी बाबत वादग्रस्त वक्तव्यांच्या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध कारवाईसाठी राज्यभर आंदोलने आणि निवेदने सुरु आहेत तर आता गायकवाड यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ मैदानात उतरल्याचे दिसून आले. आज खामगावात त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यलयासमोर आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली तर राज्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटीची प्रकरणे निवृत्त न्यायाधीशांकडून फेर तपासणी करून खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.

खामगाव तालुक्यातील एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या बुलडाण्याचे आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत गावांत असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच १० हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करु, असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांच आमदारकी रद्दबातल करण्यात यावी अश्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर आंदोलने आणि निवेदने देण्यात येत आहेत.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

 

 

lead storyVBA