मराठी सिनेमा ‘हर हर महादेव’ बाॅलिवूड वर पडणार भारी

'राम सेतु' आणि 'थॅंक गाॅड' साठी ठरू सकतो धोका!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

मुंबई, 23 ऑक्टोबर :-  दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला बाॅलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमार स्टारर ‘राम सेतू’ आणि अजय देवगण स्टारर ‘थॅंक गाॅड’ या चित्रपटावार सर्वांचे लक्ष लागले आहे. बाॅलिवूड आधीच अडचणीत आहे आणि या परिस्थितीत दक्षिण आणि हाॅलिवूड चा धोका दिसत आहे. पण दिवाळीत या बाॅलिवूड कलाकारांना त्यांच्या चित्रपटांसाठी खर्या अर्थाने आव्हान असरणार चित्रपट म्हणजे मराठीचा ‘हर हर महादेव’. अभिजित देशपांडे यांचा हा चित्रपट संपूर्ण भारतात हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. आजकाल हिंदी प्रेक्षक ज्या प्रकारचा कंटेट पाहत आहेत, त्या प्रकारात हर हर महादेव हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. मराठी-हिंदी सोबतच हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

‘हर हर महादेव’ ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे एकेकाळचे सरसेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची कथा आहे. चित्रपटात सुबोध भावे ने छत्रपती शिवाजी महाराजांची तर शरद केळकर ने बाजी प्रभू देशपांडे यांची भुमिका साकारली आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे मराठीत मोठे नाव आहे. तर शरद केळकरांचे हिंदीत ही चांगलीच फॅन फाॅलोइंग आहे. बाजी प्रभू देशपांडे यांच्या मुघलांविरूध्दच्या लढ्याची संपूर्ण कथा ही या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट मराठीतच नव्हे ता हिंदीत ही प्रेक्षकांच्या मनात उत्साह भरून टाकणारा विषय असल्याचे निर्माता दिग्दर्शकाचे मत आहे. चित्रपटाच्या या ऐतिहासिक कथेत 300 मराठा योध्दे, 12 हजार मुघल सैनिकांशी लढा देतात आणि जिंकतात. या युध्दात मराठी सैन्याचे नेतृत्व बाजी प्रभू देशपांडे यांच्याकडे होते.

हे पण वाचा :-

बिबटाचा हल्ला, शेतकरी महिला व लहान बाळ गंभीर जखमी

राजे अम्ब्रिशराव महाराज यांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली, भामरागडला आर्थीक मदत 

'Har Har Mahadev'marathi movie