लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 26 ऑगस्ट : राज्य भारतील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन पार पडले. या आंदोलनाला राज्यभरातील १० हजार पेक्षा जास्त आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते, ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. आश्रमशाळांची बदलाळलेली वेळ पूर्ववत ११ ते ५ करणे, शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करणे, रोजंदारी कर्मचारी, कंत्राटी (कला, क्रीडा, संगणक) कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, “काम नाही वेतन नाही” हे अन्यायकारक धोरण रद्द करून अनुदानित आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे, १० वी व १२वीचे निकाल कमी लागल्यास घोषित करण्यात आलेल्या अन्यायकारक शिक्षा रद्द करणे, मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देणे, रिक्त पदे भरणे इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यापक पाठींबा मिळाला आहे.
सिटू प्रणित, आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे
विराट एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन, संघटनेचे अध्यक्ष कॉ. डॉ. डी.एल कराड व सरचिटणीस प्रा बी टी भामरे यांच्या नेतृत्वाखाली राजधानी मुंबईतील प्रसिद्ध आझाद मैदानावर पार पडले.
आंदोलकांच्या मागण्या
१) आश्रमशाळांची वेळ बदललेली वेळ पूर्ववत ११ ते ५ करणे.
२) शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करणे.
रोजंदारी कर्मचारी, कंत्राटी (कला, क्रीडा, संगणक) कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे.
३) “काम नाही वेतन नाही” हे अन्यायकारक
धोरण रद्द करून अनुदानित आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे.
४) १० वी व १२वीचे निकाल कमी लागल्यास घोषित करण्यात आलेल्या अन्यायकारक शिक्षा रद्द
करणे,
५) मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देणे, आश्रमशाळातील रिक्त पदे भरणे,
६) जुनी पेन्शन योजना लागू करणे,
७) नवीन आकृतीबंधानुसार रद्द झालेली ६५०० हजार पदे पुनर्जीवित करणे.यासारख्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनाला मोठा राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा पाठींबाआश्रमशाळा शिक्षकांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे आंदोलनस्थळी आवर्जून उपस्थित होते.
सदर आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांनी लेखी पाठींबा जाहीर केला
तर,आंदोलनाची दखल घेत शिवसेना युवानेते श्री आदित्य ठाकरे यांनी थेट महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र
लिहित,सदर मागण्यांवर तातडीने सकारात्मक विचार करण्याची विनंती केली, तसेच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेकभाऊ पंडित (मंत्री दर्जा) यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र्जी फडणवीस यांना पत्र लिहित विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन आश्रमशाळांची वेळ पूर्ववत ११ ते ५ करण्याची आग्रही मागणी केली.
आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष श्री काळूराम धोदडे यांनीही सदर आंदोलनाला लेखी पत्राद्वारे जाहीर पाठींबा दिला आहे तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, शालेय व्यवस्थापन समिती यांनी आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ होण्यासाठी जाहीर पाठींबा दिला आहे. “शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ येणे अत्यंत दुर्दैवी असून, आश्रमशाळा शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घडवून देईल, तसेच वेळेचा प्रश्न व इतर समस्या मार्गी लागेपर्यंत मी कायम तुमच्यासोबतच असेन” असे आश्वासन विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे यांनी उपस्थित आंदोलनकर्त्यांना दिले.
हे पण वाचा :-