गोंडवाना विद्यापीठात जागतिक कर्करोग दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 7 फेब्रुवारी :- राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. विवेक जोशी, यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनता, व पॅकेट बंद खाद्यपदार्थामुळे कशाप्रकारे कर्करोगा सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी काय करायला हवे याविषयी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमात प्रा. डॉ.सविता साधमवार आणि प्रा. गौरी ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्राध्यापक संदीप कागे, प्रा.डॉ. शिल्पा आठवले तसेच विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, प्रा.डॉ. प्रमोद जावरे तर आभार समन्वयक डॉ.वैभव मसराम यांनी मानले. या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घेतला.

हे पण वाचा :-

gondawana university