मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 6 मार्च: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त मुंबई येथे असून आज कोरोना चे लक्षण दिसल्याने त्यांनी कोव्हीड टेस्ट केली, टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार ते घेत आहे. लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेत मंत्री विजय वडेट्टीवार रुजू होईल .

मागील 2 दिवसांत संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घेण्याचे आवाहन मंत्री विजय वडेटटीवार यांनी केले आहे.

Vijay Wadettiwar