अहेरी विधानसभा क्षेत्रातील निधी अभावी रखडलेल्या बस स्थानकांच्या कामाच्या मुद्यावर आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी सदनाचे वेधले लक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १० मार्च: अहेरी विधानसभेतील आलापल्ली सिरोंचा आणि अहेरी येथील बसस्थानकांचे कार्य निधीअभावी रखडलेले आहे. या संदर्भात अहेरी विधानसभा आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी बसस्थानक,  आलापली व सिरोंचा बसस्थानक ला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानंतर शासनाने पहील्या टप्प्याचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या कामाला 2018 साली सुरुवात सुद्धा झाली होती.मात्र त्यानंतर निधी अभावी बसस्थानकांचे बांधकाम रखडले आहे.त्यामुळे 10 महिन्यात पूर्ण होणाऱ्या कामाला लॉकडाउन व कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे विलंब झाला आहे. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी या रखडलेल्या बांधकामाच्या प्रश्नी सदनाचे लक्ष वेधले अतिदुर्गम  मागास क्षेत्राच्या विकासासाठी  सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी आ आत्राम यांनीविधानसभेत केली.यावर उत्तर देतांना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, येत्या वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी ची मागणी केली आहे  निधी उपलब्ध झाल्यावर ही रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्राधान्याने निधी देणार असल्याचे विधानसभेत सांगितले.

Dharmaraobaba Atram