अन…’ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’, आ.प्रणिती शिंदें

आ. प्रणिती शिंदेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका.

काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केलीय. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात “ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली”. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान मोदींच जबाबदार आहेत. मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात.एकदाही ते प्रसारमाध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही, अशा शब्दात आ. शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवलाय.

सोलापूर दि.१२ ऑगस्ट : काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केलीय. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात “ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली”. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान मोदींच जबाबदार आहेत. मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात.एकदाही ते प्रसारमाध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही, अशा शब्दात आ. शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवलाय. पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला मतदान केलं तर ते भाजपला जातं. त्यामुळे आधी शिक्का मारुन केलं जाणारं मतदानंच योग्य होतं.

बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशा शब्दात आ.प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्याचबरोबर मतदान प्रक्रियेत बदल करण्याचे संकेतही दिले आहेत.

आ.प्रणिती शिंदे उजनीच्या पाण्यावरुन आक्रमक.

 ‘प्राण जाये, पर पाणी न जाये ’ , उजनीतील ५ टीएमसी पाणी इंदापुराला घेऊन जाऊ दिले जाणार नाही. अशी भूमिका सोलापूर शहर मध्यच्या आ. प्रणिती शिंदे यांनी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती.

सोलापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या उजनी धरणातील पाणी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या मतदार संघातील २२ गावांसाठी नेल्याचा आदेश काढल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत होता. त्या अनुषंगाने प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेवून ‘प्राण जाये पर पाणी न जाये’, ही भूमिका त्यांनी घेतली होती. सोलापूरच्या हक्काचे एक थेंब देखील पाणी नेऊ दिलं जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली होती.

हे देखील वाचा,

गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर:पोलीस अधीक्षक अंकित गोयल

“वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसी येथे मियावाकी वनीकरणास सुरूवात!

CM Uddhav Thakareylead storiyashomati thakur mla