मॉडेल डिग्री कॉलेज इतर महाविद्यालयासाठी एक मॉडेल असावे: राहुल म्हात्रे

मॉडेल डीग्री कॉलेज ला उपसंचालक राहुल म्हात्रे यांची भेट
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 18 मे – राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(RUSSA/रूसा) चे उपसंचालक राहुल म्हात्रे (आयएएस) यांनी नुकतीच गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेजला भेट दिली. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मॉडेल डिग्री कॉलेज चे प्राचार्य डॉ. शशिकांत अस्वले, विद्यापीठ अभियंता इंंजि. जितेंद्र अंंबागडे, मॉडेल डिग्री कॉलेजचे समन्वयक डॉ. संदीप लांजेवार उपस्थित होते.

भेटी दरम्यान मॉडेल डिग्री कॉलेजच्या स्वतंत्र महाविद्यालयाच्या इमारत बांधकाम प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाद्वारे सुरू असलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेतली. अभ्यासक्रमाची रचना करताना ज्या उद्देशाने मॉडेल डिग्री कॉलेजची स्थापना करण्यात आलेली आहे ते उद्देश या अभ्यासक्रमातून पूर्ण होतात की नाही याची पडताळणी नक्की करण्यात यावी. गडचिरोली येथे सुरू असलेल्या मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण व रोजगारक्षम अभ्यासक्रमाची रचना केल्याबद्दल उपसंचालक राहुल म्हात्रे यांनी समाधान व्यक्त केले. मॉडेल डिग्री कॉलेज हे इतर महाविद्यालयासाठी नक्कीच मॉडेल असावे असा आशावादही त्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला. गडचिरोली येथील मॉडेल डीग्री कॉलेज द्वारे सुरू असलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ‘ विद्यापीठ आपल्या गावात’ हा अभ्यासक्रम अतिशय नाविन्यपूर्ण तसेच महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असल्याने या अभ्यासक्रमाची यशस्वीता ही महाराष्ट्राला नवीन दिशा निर्माण करणारी ठरू शकते असेही आपल्या भेटीदरम्यान मनोगत त्यांनी व्यक्त केले.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी विद्यार्थी निर्मित बांबू हस्तकलेचा गुलदस्ता भेट देऊन त्यांचे स्वागत केले. ते बघून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच गोंडवाना विद्यापीठ होय असेही कौतुकाचे उद्गार त्यांनी काढले.यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.