मोदी सरकार जातीयवादी आणि धर्मांध

पृथ्वीराज चव्हाणाचे टिकास्त्र
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 26, ऑक्टोबर :-  देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. मोदी सरकार जातीयवादी आणि धर्मांध असून अश्या सरकारचे आम्ही कौैतुक का करावे असे टिकास्त्र माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत मग आम्ही मोदीचे कौतुक का करावे? असा सवाल ही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलं ?

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा देशाचे विभाजन करण्याचा डाव आहे. केंद्र सरकारकडून देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरलं जात आहे. आम्ही विरोधी पक्षात, मग मोदीचं कौतुक का करायचं? मी टीका करत राहीन भाजपाने उत्तर द्यावं असं पृथ्वीराज  चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करणार आहेत यावरून देखील टोला लगावला आहे.

शिंदे आणि फडणविसांवर सुद्धा टीका

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत, सोबत अयोध्येला पण जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, राज्याचा दौरा केला पाहिजे. राज्यातील जनेतची दु:ख समजून घेतली पाहिजेत. राज्यात ओला दुष्काळ आहे, मदत केली पाहिजे. राज्यात जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरत असतील तर चांगली गोष्ट आहे.

हे देखील वाचा :-

ChavanPrithviraj