बीएसएनएल दुरध्वनीवरून मोबाईल संपर्क प्रक्रियेत फेरबदल

  • 15 जानेवारीनंतर मोबाईलवर संपर्कासाठी शुन्य लावावा लागणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 15 जानेवारी: आजपासून कॉल करण्याबाबत एक बदल होणार आहे. आतापासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी आधी ‘0’ लावावा लागेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने याची शिफारस केली होती, त्यानंतर आता दूरसंचार विभागाने ती मान्य केली आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना अधिकाधिक क्रमांक मिळू शकेल.

दूरसंचार विभागाने नोव्हेंबरमध्ये म्हटले होते की, 15 जानेवारीपासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना ग्राहकांना प्रथम शून्य डायल करावे लागेल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की या टप्प्यामुळे भविष्यात बर्‍याच नवीन संख्या निर्माण होतील. सुमारे 253.9 कोटी नवीन संख्या तयार होण्याची अंदाज आहे.

भारत संचार निगम (बीएसएनएल) च्या दुरध्वनीवरून कोणत्याही कंपनीच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल) संपर्क करण्यासाठी 15 जानेवारी 2021 नंतर नंबर डायल करण्यापुर्वी शून्य लावून मग नंतर पुर्ण संपर्क क्रमांक डायल करावा लागणार आहे. जर मोबाईल 94* असेल तर यानंबर वर संपर्क करण्या अगोदर 094 डायल करावे लागेल. असे चंद्रपूर येथील भारत संचार निगम लिमिटेडचे महाप्रबंधक यांनी कळविले आहे.