लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील उपकेंद्र चवेला येथे गणेशोत्सव महोत्सवानिमित्त २ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. अविनाश दहिफळे (THO, धानोरा) व मा. डॉ. कुणाल मोडक (MO, PHC गोडलवही) यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या मेळाव्यात तब्बल २५० हून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित रुग्णांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.
या मेळाव्यात क्षयरोग निदान मोहिमेअंतर्गत १०६ संशयित रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले, ८० जणांची रक्त तपासणी झाली, ३० नागरिकांना गोल्डन कार्ड वितरीत करण्यात आले, तर २० जणांचे थुंकी नमुने घेण्यात आले. तसेच नागरिकांना क्षयरोग, हिवताप, डेंग्यू आणि संसर्गजन्य आजारांविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
मेळाव्याला डॉ. दहिफळे, डॉ. मोडक, डॉ. कन्नाके (MMO), भडके (LSO), गिरीष लेनगुरे (STS), अनिल शंखावार (MTS), रकीम शाह (HI), पल्लवी वायरे (LT), सदाशिव मंडावार व श्रीकांत कोडापे (MPW), सूरज गेडाम (SFW), गटप्रवर्तक, आशा व अन्य आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.