शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

  • खा. अशोक नेते यांची ग्वाही.
  • धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे जनसंपर्क दौरा.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

धानोरा, दि. 11 ऑक्टोंबर : केंद्र शासनाच्या वतीने गोरगरीब नागरिक, कामगार व शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या योजनांचा लाभ घेऊन आपला सर्वांगिण विकास साधावा तसेच काही समस्या, अडचणी आल्यास अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदर समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली. धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे जनसंपर्क दौऱ्या दरम्यान नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक लोकाभिमुख योजना अंमलात आल्या.

शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना अंमलात आणून वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिल्या जात आहे. महिलांना चुलीपासून सुटका मिळावी म्हणून देशातील 9 करोड महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. कोविड -19 च्या लॉकडाऊन काळापासून गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. तसेच घरकुल, शोच्चालय यासह अनेक योजनाचा लाभ नागरिकांना मिळत आहे असेही यावेळी खास. अशोक नेते यांनी सांगितले.

जनसंपर्क दौऱ्यादरम्यान प्रामुख्याने आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, धानोरा चे तालुका महामंत्री विजय कुमरे, पेंढरीचे सरपंच पप्पु येरमे, उपसरपंच, ग्रा पं सदस्य तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश गेडाम यांनी केंद्राच्या योजना व सरकारच्या कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले