शैक्षणिक विकासासाठी मा संदीपजी जोशी यांना बहुमताने निवडुन द्या, खासदार अशोक नेते यांचे आवाहन.

विकास व समाजसेवा करण्याची संधी मा.संदीप भाऊंना द्या- बावनकुळे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 25 नोव्हेंबर:-

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार मा श्री संदीपजी जोशी हे नागपूर चे महापौर असून सामाजिक कार्यकर्तेही आहेत त्यांना सामाजिक काम व विकास काम करण्याची आवड असून नागरिकांची सेवाही ते मनापासून करतात अशा सच्चा समाजसेवकाला भाजपने उमेदवारी दिली असून विकासासाठी मा संदीप भाऊंना भरघोष मताने निवडून आणा। असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. आज दि 25 नोव्हेंबर रोजी आयोजित पदवीधर मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा चंद्रशेखर बावनकुळे यांनी मा संदीपजी जोशी यांच्या जीवन कार्य व सामाजिक कार्याची माहिती दिली व त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी प्रचंड बहुमताने निवडुन आणण्याचे आवाहन केले. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मा संदीपजी जोशी यांच्या प्रचारार्थ आज दि. 25 नोव्हेंबर रोजी चामोर्शी मार्गावरील फंक्शन हॉल येथे पदवीधरांचा मेळावा पार पडला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा श्री चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आम डॉ देवरावजी होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते ओबीसी मोर्चा चे विदर्भ संपर्क प्रमुख बाबुराव जी कोहळे, युवामोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस मा.शिवानीताई दाणी, युवा मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष संकेत बावनकुळे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रा.प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, जिप च्या समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, जिप सदस्या लताताई पुंघाटे,ज्येष्ठ नेते नप उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव जी फाये, युवामोर्चा चे माजी जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,व अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी पदवीधर युवकांनी आपली पसंती जाहीर करताना सरळ उभी रेषा काढावी व मतदान केंद्रावरचाच पेन वापरावा तसेच मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मोबाईल क्रमांक 9560362363 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहनही खासदार अशोक नेते यांनी केले आहे.