तृतीयपंथीसाठी महापालिकेचे राज्यातील पहिलं विशेष लसीकरण सत्र

पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तृतीयपंथीचे लसीकरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ठाणे १९ जून : लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून तृतीयपंथीसाठीचे राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्कींग प्लाझा येथे संपन्न झाले.

शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ‘’विशेष लसीकरण सत्र’’ आयोजित करण्यात आले होते.

या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. यावेळी उपस्थितीत सर्व तृतीयपंथीनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.

हे देखील वाचा  :

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

दोन युवतींवर जडले प्रेम, एकाच मांडवात केले दोघींशी लगीन

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

 

Eknath Shindelead storythird person vaccination