मूर्तिजापुरात घरफोडी; ३ लाखा पर्यंत लुट

घरी कोणीच नसल्याने अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून आत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मूर्तिजापूर 12 जानेवारी:– मूर्तिजापुरा येथील महाकाली नगरात अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ७७ हजार ऐवज लंपास केल्याची घटना घडली. घटनेच्या दिवशी त्या बँकेच्या कामानिमित्ताने दुपारी १२ वाजता बाहेर गेल्या होत्या. तर पती व मोठा मुलगा शेतावर तर लहान मुलगा शाळेत गेला होता. दुपारी लहान मुलगा शाळेतून घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. येथील महाकाली नगरात राहणाऱ्या वंदना ज्ञानदेव खंडारे ह्या आपले पती व दोन मुलांसह राहतात.

दुपारी १२ ते २ घरी कोणीच नसल्याने अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, घरात असलेले कपाट चोरट्यांनी तोडले व कपाटात ठेवले सोन्याचे एक नेकलेस, गहू पोत, एक मीनी व मोठे मंगळसूत्र, कानातले तीन-चार जोड व अंगठी यासह २ लाख ४७ हजाराचे सोन्याचे दागिने त्याच बरोबर शेती कामासाठी घरात ठेवलेले ३० हजार रुपये नगदी असा २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केला. मुर्तिजापूर शहर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

(हे पण वाचा :शिर्डी, पंढरपूरला दर्शनाला जात असाल तरअत्यंत महत्वाचा निर्णय)