कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना परस्पर दत्तक घेणे कायदयाने गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.07 मे : कोरोनामुळे पालक गमविलेल्या लहान मुलांची सध्या बेकायदेशीर रित्या परस्पर दत्तक घेणे व विक्री करणे सुरु आहे. हा प्रकार नुकताच समोर आला आहे. समाज माध्यमावर संदेश फेसबुक व व्हॉटसॲप वर चुकीचे मॅसेजेस येत आहे. त्यावर लहान मुलांना दत्तक देणे आहे अस या मॅसेजेस मध्ये म्हटले आहे. म्हणून अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 तसेच स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी 8308992222, 7400015518 या क्रमांकावर माहिती दयावी असे महिला व बाल विकास आयुक्तालयाने कळविले आहे.

समाज संकटाकडुन अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैर फायदा घेण्याचा घटना गंभीर असुन त्यावर कायदयानुसार कठोर कार्यवाही केली जाईल. असे ही विभागाने कळविले आहे. कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्या बरोबर बालकांच्या समस्या मध्ये ही मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे. या बालकाचे आरोग्य , संरक्षण , बालविवाह , बालकामगार,भिक्षेकरी या सारख्या समस्या सोबतच कोविड – 19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यु झाल्यामुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकाचा काही वेळा आप्तस्वकीयाकडुन स्विकार न झाल्यामुळे या समस्यामध्ये अधिक भर पडत आहे.

बालकांचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करत असुन काही समाज कंटक या समस्येचा वापर संधी म्हणुन करुण घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याच चित्र समाज माध्यमावरील पोस्ट वरुन दिसुन येत आहे. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे-देणे व खरेदी -विक्री करणे हा कायदयानुसार गंभीर गुन्हा आहे.बालकांची काळजी व सरंक्षण अधिनियम 2015 तसेच दत्तक नियमावली 2017 नुसार कठोर कार्यवाहीस पात्र आहे.

तसेच प्रत्येक जिल्हयातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  कार्यालय , जिल्हा बाल संरक्षण कक्ष , बाल कल्याण समिती व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधुन या बालकांना ताब्यात घ्यावे . त्यांची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल.

ज्या पालकांना बालक दत्तक घ्यावयाचे आहे अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या कारा चा प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करु शकतात असे ही महिला व बाल विकास विभागाने कळविले आहे.

हे देखील वाचा :

मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देणे-घेणे कायद्याने गुन्हा

गडचिरोली जिल्ह्यात बारा कोविड नियंत्रण कक्षातून मदतीचा हात

 

adopt childlead story