माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येण शक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिम राबविणार - पालकमंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा उदघाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकारी कार्यालयातून महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदूर्ग पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा  : 

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिकेत ३०० जागांसाठी भरती

lead storySindhudurg General Hospital