लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरीतील अतिक्रमण धारकांवर नगरपंचायतीचा हातोडा
183 अतिक्रमणधारकांना नोटीस..
अहेरी दि,12 : राजनगरीच्या विकासात दशकांनुदशके अडसर ठरू पाहत असलेले शासकीय जागेवरील, नाल्यांवरील खाजगी दुकानदार तथा इतरांचे अतिक्रमण बाबत महाराष्ट्र नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार 183 अतिक्रमण धारकांना वेळेत अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिली. मात्र नोटिसीनुसार अतिक्रमणधारकांनी कार्यवाही न केल्याने नगरपंचायतीने बुलडोजर व पोलिसांच्या सहकार्याने अहेरी येथील अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केल्याने गरीब हातठेले धारकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील बस स्थानक ते हनुमान मंदिर, गांधी चौक ते राजवाडा रोड, आझाद चौक ते दान्सूर चौक, मस्जिद चौक ते पोलीस स्टेशन रोड व गांधी चौकापासून पंचायत समिती पर्यंतच्या रस्त्यावरील 183 दुकानदार तथा इतर इस्मानी नगरपंचायतीच्या परवानगीशिवाय अतिक्रमित बांधकाम केले.
नोटीसी शिवाय कोणतीही कारवाई करू शकत नसल्याने 3 एप्रिल 2023 ला संबंधित धारकांना नोटीस देऊन 15 एप्रिल पर्यंत सार्वजनिक रस्त्यावर, नालीवर असलेले अतिक्रमण हटविण्यास नोटीसीद्वारे कळविले होते.सोबतच पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना 5 एप्रिलच्या पत्रांन्वये 19 एप्रिलला अतिक्रमण हटविण्याचे असल्याने लागणाऱ्या पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती सुद्धा नगरपंचायतीने केली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. मात्र स्थानिक पोलीस अधिकारी सुट्टीवर असल्याने, सहमतीने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अतिक्रमण हटविण्याचे निश्चित झाले असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
त्याचीच कार्यवाही अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमण न हटविल्याने आज बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्यात प्रारंभ झाला. लगेच राजवाडा रोड, गांधी चौक, दानशूर चौकतील अतिक्रमणावर बुलडोझर चालणार असल्याने अतिक्रमित दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.
अतिक्रमण काढण्यावरून नगरपंचायतीचा भेदभाव होत आहे. गरिबांचे पानठेले,हातगाळे उचलले जातात. मात्र श्रीमंतानी केलेल्या अतिक्रमणावर सूट का? असा प्रश्न एसबिआय बँक जवळील एका अतिक्रमण धारकाने केला.