new coronavirus strain: संशयित रुग्णांची संख्या 5, नागपुरातून चिंताजनक बातमी

  • नागपूरमध्ये आयर्लंडमधून आलेल्या 36 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
  • नागपूरचा महानगर पालिकचे वैद्यकीय आरोग्य अधिकारीही दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबल उढाली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, 28 डिसेंबर :- ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा विषाणू सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातही खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागपूरमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनच्या संशयिय रुग्ण संख्येत वाढ झाली असून संख्या 5 वर पोहोचली आहे.

नागपूरमध्ये आयर्लंडमधून आलेल्या 36 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. संशयित रुग्ण हा 25 नोव्हेंबरला आयर्लंड येथून दिल्लीत आला होता. त्यानंतर रायपूरमध्ये लग्न समारंभात सहभागी झाला होता. लग्न सोहळा आटोपल्यानंतर ही व्यक्ती 14 डिसेंबरला नागपुरात दाखल झाली होती. अचानक कोरोनाची लक्षण आढळून आल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 26 डिसेंबरला कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता. या संशयित रुग्णाचे नमुने हे पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, नागपूरचा महानगर पालिकचे वैद्यकीय आरोग्य अधिकारीही दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबल उढाली आहे. कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे तपासणी करण्यात आली होती. त्यात रविवारी अहवाल हा पॉझिटिव्ह आढळून आला होता.

GMC alertnagpur alertNagpur new covidnew corona strain