पंजाबच्या संत्र्यापेक्षा नागपुरी संत्रा लय भारी !

संत्त्र्याची आवक वाढताच घसरले दर :

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  हिवाळा आला की  संत्रा , बोर, चिकू, पेरू खाण्याची मजा असते. सध्या मार्केटमध्ये संत्राची आवक वाढलेली असून नागपूरच्या संत्रास प्रचंड मागणी असते.. काही दिवसांपासून बाजारात नागपूरच्या संत्र्याची आवक वाढल्याने संत्र्याच्या दरात घसरण झाली आहे.

संत्रामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी व अन्य पोषक तत्वे आहेत. संत्रा हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर त्यामुळे संत्राचे  सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. संत्र्याच्या सेवनामुळे लघवीचे  व किडनीचा आजार बरे होत असतात  त्याचप्रमाणे हृदयरोग, कॅन्सर अशा आजारापासून शरीराला  दूर ठेवतो. त्याशिवाय संत्राच्या सालीची बुकटी करून त्वचेवर लावल्यास  त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच  पोटातील  गॅस, उच्च रक्तदाब, स्नायूचे वेदना, जुलाब, गर्भवती महिला, यकृताचे रोगी यासाठी सुद्धा संत्रा आरोग्यदायी आहे.

जिल्ह्यातील आठवडी बाजारात पंजाब राज्यातील  प्रसिध्द असलेल्या किनू संत्र्याचा बोलबाला होता. परंतु  नागपूजची संत्री बाजारात येताच  पंजाबच्या  किनू संत्र्याच्या मागणीत घट झाली असून त्यांचे  दरही घसरलेले आहेत. शहरातील आठवडी बाजारात नागपुरी संत्र्याची आवक वाढल्यामुळे ग्राहक पंजाबच्या किनू संत्र्यापेक्षा नागपुरी संत्रा खरेदी करताना दिसत आहेत. सध्या गुजरीमधील फळविक्रेत्यांकडे नागपुरी संत्र्याची आवक वाढल्यामुळे संत्रा ६० ते ८० रुपये किलोप्रमाणे मिळत आहे.

हे देखील वाचा,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य, चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’ वर झळकला; वाशीमच्या देपूळ येथील ज्ञानेश्वर आघाव..

 

नागपूरच्या संत्रास प्रचंड मागणी असते.व्हिटॅमिन एव्हिटॅमिन बी व अन्य पोषक तत्वे आहेतसंत्रामध्ये व्हिटॅमिन सीसंत्र्याच्या सेवनामुळे लघवीचे  व किडनीचा आजार बरे होत असतात