पुणे शहरात शिवसेनेला मोठं खिंडार, नाना भानगिरे शिंदे गटात दाखल

पश्चिम महााष्ट्रातील जबाबदारी नाना भानगिरे यांना दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुणे 06 जुलै  :-  शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पश्चिम महााष्ट्रातील जबाबदारी नाना भानगिरे यांना दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, नाना भानगिरे यांच्या शिंदे गटात सहभागी होण्यामुळे पुणे शहरात शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत भानगिरे यांनी लढवली आहे तीन वेळा विधानसभा निवडणूक तर शिवसेनेकडून मनपामध्ये तीन वेळा नगरसेवक झाले आहेत.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुण्यात अद्याप शिंदे गटाला उघड उघड कोणीही पाठींबा दिलेला नव्हता. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ज्येष्ठ नगरसेवक  नाना भानगिरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा गट जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे  नाना भानगिरे यांना विधान परिषद आमदार पदाची संधी अथवा राज्यातील महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी काही माजी नगरसेवक मुंबईत ठिय्या मांडून आहेत. ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी या नगरसेवका चर्चेसाठी बोलविल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, अगामी महापालिका निवडणूकीत शिंदे गट शिवसेनेला धक्का देणार असल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.

Aditya ThackareyEknath Shindenew shena partypune palikasanjay rautUddhav tahakare