मालेगावच्या माणके-चिखल ओहोळ येथील जवानाला वीर मरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक डेस्क न्यूज

नाशिक दी.31ऑक्टो :-देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या माणके – चिखल ओहोळ येथील रहिवासी असलेले मनोराज सोनवणे यांना वीर मरण आले आहे.भारतीय सैन्य दलात असलेले मनोराज सोनवणे हे गेल्या सोळा वर्षांपासून भारतीय लष्करातील मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते.

२१ पॅराट्रप या स्पेशल फोर्स मध्ये भारताच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशात अधिक उंचावर कर्तव्य बजावत असतांना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल त्यांची प्राणज्योत मालावली आहे. त्यांच्या निधनाने देशाने वीर जवान गमावला आहे.

मनोराज सोनवणे यांच्या पार्थिवावर मूळ गावी आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.