मोठी बातमी! चक्कर आल्याने एकाच दिवसात 11 जणांचा मृत्यू

नाशिकमध्ये एका प्रकारामुळे खळबळ माजली आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक डेस्क 21 एप्रिल:- राज्यासमोर कोरोनाचें संकट असताना नाशिकमधून आणखी एक चिंतेची बाब समोर येत आहे. नाशिकमध्ये एकाच दिवसात 11 जणांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या 11 जणांनी चक्कर आल्याने जीव गमावल्याची माहिती मिळते आहे.

श्वास घेण्यास त्रास होण्याचे आणि त्यानंतर त्यांच्या छातीत कळा देखील मारू लागल्या, चक्कर आल्याने त्यांनी प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व व्यक्तींचा मृत्यू त्यांच्याच घरात झाला आहे. आरोग्य यंत्रणा या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत असून, याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान गेल्या 8 दिवसात अशाप्रकारे मृत्यू झालेल्यांची संख्या 24 झाली आहे.

15 एप्रिल रोजी देखील अशीच घटना घडली होती. यादिवशी नाशिक शहरात 9 जण दगावले. त्याआधी दोन दिवसांपूर्वी देखील एकाच दिवसात चक्कर आल्याने 4 जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकमधील या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

nashiknashik dealthnashik govt