राष्ट्रीय आयुर्वेद दिन तसेच धन्वंतरी जयंती 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 23 ऑक्टोबर :-  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. धुर्वे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय आयुर्वेद दिन तसेच धन्वंतरी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
डॉ. भावना आत्राम यांनी आयुर्वेद दिवस हर दिन हर घर आयुर्वेद संकल्पना आधारित संबोधन केले. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दिनेश रोकडे यांनी १ ते दिड महिने पासून सुरू असलेल्या विविध उपक्रम आणि आयुर्वेद चिकित्सा सेवा या बद्दल सारांश सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी संकल्पना आधारित विस्तृत पणे दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे आयुर्वेद वनस्पती वापर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आकर्षक संबोधन केले.
आयुष ADAO डॉ. उरकूडे समवेत  डॉ. ठाकूर, डॉ. कोहळे, डॉ. कापगते तसेच खेरकर, आयुष योग शिक्षक पेशटटीवार, सारंग, शिल्पा सिडाम यांच्या सहकार्याने  साजरा करण्यात आला. डॉ आलाम, डॉ गेडाम,  मेट्रन मैडम समवेत ट्युटर प्रिंसिपल, ट्युटर सर्व अधिकारी,  कोल्लुरी,  मोटघरे व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. प्रास्ताविक अजय ठाकरे यांनी केले. Vote of thanks ट्युटर नैन्सी  मैडम यांनी सर्वांचे वैयक्तिक अभिवादन करून संकल्पना हर दिन हर घर आयुर्वेद चिकित्सा नेहमी घेण्याचे मार्गदर्शन केले.
हे पण वाचा :-

आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे रोजच्या जीवनात मोठा उपयोग

केंद्र सरकारने रद्द केला परदेशी निधी परवाना

 

Ayurveda DayNational