नक्षल्यांकडून आज जिल्हा बंदचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. १० नोव्हेंबर :– दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी अचानक जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्हा पोलिसांनी धानोरा-कोरची तालुक्याच्या सीमावर्ती भागातील किसनेली गावाजवळच्या जंगलात पाच नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. याविरोधात नक्षल्यांनी पत्रके काढून 10 नोव्हेंबर ला बंदचे आवाहन केले आहे.

नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय सचिव पवन यांनी हे पत्र काढले आहे. पोलिस गेल्या तीन दशकापासून खोट्या चकमकीत नक्षल्यांना ठार करीत आहेत. असा आरोप पवनने केलेला आहे.
किसनेेली जंगलात झालेल्या घटनेचा माओवादी कम्युनिस्ट पक्ष निषेध करीत असून या घटनेच्या विरोधात 10 नोव्हेंबरला बंद पाळण्याचे आवाहन पवन यांनी केले आहे.
पोलिसांनी खोट्या चकमकिचा आधार घेत निष्पापाना मारण्याची मोहीम उघडली आहे, हे चुकीचे असल्याचे पत्रकात पवन याने म्हटले आहे.

Naxals