पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज – अनिल मस्के

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचा कुटुंब स्नेहमिलन सोहळा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

वाशीम दि ४ एप्रिल : आपल्या प्रखर लेखणी आणि वाणीतुन समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून पीडितांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणारे पत्रकार दुर्लक्षिल्या जात असल्याची वास्तविकता आहे. अल्पशा मानधनावर जनसेवेत उभे आयुष्य घालविणारा पत्रकार शासन, प्रशासन किंबहूना समाजस्तरावरही दुर्लक्षित राहतो. त्यामुळे पत्रकार कुटुंबियांना विनातारण कर्ज पुरवठा करता यावा या दृष्टीने पत्रकार कुटुंबियांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ नेमण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्हॉईस ऑफ मीडिया शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे ग्रामीण राज्याध्यक्ष अनिल मस्के यांनी व्यक्त केले.

वाशीम येथील हॉटेल इव्हेंन्टो येथे आयोजित कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष अनिल मस्के यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. दिपक शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संघटनेच्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले पाटील, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, रिसोड पंचायत समितीच्या माजी सभापती सुशिलाताई शिंदे आणि यिन सदस्या दिव्या देशमुख आदिंची उपस्थिती होती.

यावेळी  व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. दरम्यान, कोरोना महामारी व त्यानंतरच्या काळात पत्रकारांच्या कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख पाहवले गेले नसल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चा जन्म झाला. अवघ्या दिडवर्षात या रोपट्याचे विशाल वटवृक्षात रुपांतर झाले असून पत्रकार कल्याणासाठी संघटनेच्या विविध शाखा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, शिक्षण व निवारा या मुलभूत गरजांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती व्हाईस ऑफ मीडियाच्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले यांनी दिली.

हे देखील वाचा ,

जुनं प्रेम पुन्हा फुलविण्यासाठी प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या अल्पवयीन चिमुरड्याचे केले अपहरण

 

टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

अनिल मस्केडॉ. दिपक शेळकेसंदीप काळे