व्यक्तिमत्व विकासासाठी रासेयो शिबिराची गरज

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी: मुलांचे व्यक्तिमत्व राष्ट्रीय सेवा योजनांमध्ये भाग घेऊन घडविता येत असल्याचे प्रतिपादन इतलचेरू येथे शंकरराव बेजलवार कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते.
नुकतेच संपन्न झालेल्या विशेष शिबिराची सांगता काल करण्यात आली. शिबिरात सातही दिवस साफसफाई, मार्गदर्शन, व्याख्यान व गावाचा विकास करण्याची संकल्पना डॉ. वाय ए. काटकर, डॉ सोनाली वाघ, प्रा तनवीर शेख यांनी समजावून दिले.

सातही दिवसाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.आर व्ही घोडेस्वार, प्रा. प्रतिभा जवादे, प्रा गौरव तेलंग, प्रा. अमोल शंभरकर तसेच कुमारी शितल गोटा, राजेश उसेंडी ह्या विद्यार्थिनी प्रतिनिधींनी भाग घेतला.

समारोप वेळी विचार मंचावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मेश्राम, उपाध्यक्ष किशोर पेंदाम, प्रा जी.डी जंगमवार राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, प्रा सी एन गौरकार, प्रा. नामदेव पेंदाम, सहाय्यक अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ रूपा वाघमोडे, प्रास्ताविक प्रा गौरकार तर आभार प्रा पेंदाम यांनी मानले.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव प्रशांत पोटदुखे व कार्यकारी अध्यक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी शुभेच्छा दिल्या.