लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 10 ऑक्टोंबर : गडचिरोली जिल्ह्यात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती असून वनस्पतींचे प्रमाण व विविधता खूप जास्त आहे. त्यासाठी राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्थापन झालेल्या वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाद्वारे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून संशोधन व डॉक्युमेंटेशन करणे गरज असल्याचे मत गोंडवाना विद्यापीठातील डिग्री कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. विजय खोंडे यांनी उद्घाटनिय प्रसंगी कार्यक्रमात केले.
स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात आज वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या स्थापनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा .तानाजी मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेश हलामी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनंदा पाल, प्रा. शामल बिश्वास, प्रा. कुणाल वनकर, डॉ. अरविंद राठोड, प्रा. अतुल खोब्रागडे सुद्धा हजर होते.
वनस्पतींमध्ये औषधी गुण, फळांचे, फुलांचे, कंद व पानांचे, रानबाजी म्हणून अजूनही नागरिक याचा जीवनसत्वे म्हणून आहारात आवर्जून वापर करतात. त्यांच्या विविध प्रजातींचे मार्फोलॉजी, केमिकल कंपोझिशनच्या अभ्यासाची गरज असल्याचे डॉ.खोंडे म्हणाले. यासाठी विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्राच्या अभ्यास मंडळात रस निर्माण करावा असे मत अध्यक्ष प्रा. रमेश हलामी यांनी केले.
वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रा. हलामी तर अंतिम वर्षाची कु. वैष्णवी कैदलवार यांची उपाध्यक्ष म्हणून, सचिव पूजा मंडल, संयुक्त सचिव योगिता, कोषाध्यक्ष प्रीती गुप्ता, समन्वयक प्रा. कांचन धुर्वे, सदस्य म्हणून मोहसीन अली सय्यद , श्रीक्षेत्र राजगडकर, शुभांगी गुरूनुले, रोहित तलवार, आसिफ शेख, किशोर कोंडागुर्ले तथा इतर सदस्यांची निवड करण्यात आली.
यावेळी बीएससी भाग एक, दोन व तीनचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रमेश हलामी, संचालन प्रा कांचन धुर्वे तर आभार पूजा मंडल हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.